एक पेड माँ के नाम – वृक्षारोपण उपक्रम
एक पेड माँ के नाम – वृक्षारोपण उपक्रम…..वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अंधेरी (पश्चिम) येथील इको क्लबच्या वतीने “एक पेड माँ के...
एक पेड माँ के नाम – वृक्षारोपण उपक्रम…..
वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अंधेरी (पश्चिम) येथील इको क्लबच्या वतीने “एक पेड माँ के नाम” हा वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षांची लागवड केली तसेच लावलेल्या रोपांची नियमित काळजी घेण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली मॅडम आणि उपमुख्याध्यापक किरण सर यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले. तसेच इको क्लबच्या पवार सर, भोईर सर, शोभा मिस आणि नीलम मिस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, स्वच्छ हवा, पाणी संवर्धन, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
“एक विद्यार्थी – एक झाड” या भावनेतून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तसेच सामाजिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला.